बीड दि.17 (प्रतिनिधी):
चीन स्नैकिंग करणाऱ्या गुन्हेगारासह दहा गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या संदर्भात माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत विशेष कामगिरी करत, गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अर्थात चीन स्नेकिंग करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या गुणाकारांनी गुन्हे संदर्भात मुली दिली आहे.
गुन्हेगार ताब्यात आणि कबुली:
शिवाजी नगर पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानुसार वैभव नारायण आडोळे, रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती याने त्याच्या साथीदारासह सदर गुन्हा केला होता. सदर गुन्हेगार नवगण राजुरी ता. जि. बीड येथील बस स्थानकावर थांबला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वैभव आडोळे आणि त्याच्या विधी संघर्षग्रस्त बाल साथीदाराला ताब्यात घेतले. आरोपी वैभव आडोळे याने मागील दीड ते दोन महिन्यांपासून बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये एकूण 9 चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींवर खून, बँक रॉबरी आणि मोबाईल चोरीसारखे इतर गुन्हे महाराष्ट्र व इतर राज्यांतही दाखल आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल:
गुन्ह्यात चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, 4 मोबाईल नग, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि एक मोटरसायकल असा एकूण 11 लाख 32 हजार 680 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उघड झालेले एकूण 10 गुन्हे
(गुन्हा नोंद क्रमांक):
गुन्हे शाखेच्या तपासामुळे एकूण 10 गुन्हे उघड झाले आहेत, ज्यात बीड (शिवाजी नगर), छत्रपती संभाजीनगर (सिडीको, पुंडलीकनगर, सातारा), जालना (एस.बी. जालना), गेवराई आणि अहिल्यानगर (तोफखाना) येथील पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पुढील तपासकामी आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदर महत्त्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाने केली.