कल्याणस्वामी संस्थानचा कलशारोहन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह;
नामांकित कीर्तनकार हजेरी लावणार


भाविकांनी लाभ घेण्याचे कीर्तनकार सोनाली दिदि यांचे आवाहन



बीड दि.16 (प्रतिनिधी):
      गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्रीक्षेत्र कल्याणस्वामी संस्थानच्या मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह, 11 कोटी नामजप, त्रिकाल हरिपाठ कार्यक्रमाचे दिनांक 18 नोव्हेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, नामांकित कीर्तनकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती,  श्रीक्षेत्र कल्याणस्वामी संस्थानच्या अध्यक्षा रामायणाचार्य ह.भ.प. साध्वी सोनाली दिदि यांनी दिली. यावेळी संस्थांचे उपाध्यक्ष तथा महंत ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज यांची उपस्थित होती.
      याप्रसंगी बोलताना साध्वी सोनाली दीदी म्हणाल्या, श्रीक्षेत्र कल्याण स्वामी संस्थान हे गेल्या पाचशे वर्षां पूर्वीचे जुने संस्थान आहे. या ठिकाणी वंशपरंपरागत नववी पिढी आज अध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे.
       संस्थांनचा जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून अद्यावत दगडी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण स्वामी संस्थान मंदिराचा कलशारोहन व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सांप्रदायातील मान्यवर, नामांकित दिग्गज संस्थानला भेटी देणार आहेत.
      कलशारोहन कार्यक्रमासाठी नवसारी, सुरत येथील स्वामी श्रीहरी जीवनदास शास्त्री संस्थापक श्रीनारायण मुनी दिव्यधाम, महंत गुरुवर्य महंत शिवाजी महाराज, नारायणगड, न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री, भगवानगड, महामंडलेश्वर महादेवानंद भारती अश्वलिंग संस्थान, महंत विठ्ठल महाराज शास्त्री, गहीनाथ गडकर, शांतीब्रह्म ह.भ.प. नवनाथ बाबा, गोरक्षनाथ टेकडी, महंत स्वामी जनार्दन महाराज मच्छिंद्रगड, महामंडलेश्वर 1008 त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, इंदूवासिनी संस्थान, महंत राधाताई सानप महाराज, आईसाहेब संस्थान, महासांगवी आदी साधू, संत उपस्थित राहणार आहेत.
       सप्ताहात मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या  सप्ताहात पहिल्या दिवशी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर यांचे कीर्तन, बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी हभप आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वरगड, गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी गोरक्षक रामायणाचार्य ह.भ.प. गुरुवर्य संजय महाराज पाचपोर, शुक्रवार दिनांक 21  नोव्हेंबर रोजी गुरुवर्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर, शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी धर्मगुरू अमृता आश्रम स्वामी महाराज, बीड यांचे कीर्तन, सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. साधी सोनाली दीदी,  अध्यक्ष श्रीक्षेत्र कल्याण स्वामी संस्थान, चकलांबा यांचे कीर्तन होणार आहे.
      मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी कीर्तनकेसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
       या सप्ताहातील प्रत्येक कीर्तनास महाराष्ट्रातील ख्यातनाम, सुप्रसिद्ध गायक, वादक उपस्थित राहणार आहेत. परिसरातील महंत, गायक, वादक यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

error: Content is protected !!