कुंडलिक खांडेंचा ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश; बीड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे समीकरण बदलणार?


बीड, दि. ११ (प्रतिनिधी): बीडच्या राजकारणात मंगळवारी (दि. ११) मोठी घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची ताकद वाढली आहे. शिंदे गटातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेले कुंडलिक खांडे यांनी आज मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
खांडे यांनी मशाल हाती घेताच, त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील अनेक सरपंच आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा विजय मानला जात आहे.

error: Content is protected !!