रामराजे नाईक निंबाळकर भाऊबीज साजरी करणार नाहीत; फलटणमधील मृत महिला डॉक्टरचा पुतळा उभारणार


फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण (Phaltan) येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी यापुढे आयुष्यभर भाऊबीज साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.


आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा अर्ध पुतळा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे स्वतःच्या खर्चातून उभारणार असल्याची माहिती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. सरकारने पुतळा उभारला नाही, तर आपण पुतळा उभा करू, असे ते म्हणाले.
डॉक्टरची आत्महत्या झालेला दिवस हा ‘फलटणचा काळा दिवस’ असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. तसेच, या घटनेमुळे तालुक्यातील दहशत संपली असून, ‘नाईक निंबाळकर’ या ब्रँडचे झालेले ‘वाटोळं’ पुन्हा मोठे करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!