परळी येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत  माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा भाजपात प्रवेश!


परळी: येथील ‘दीपावली स्नेहमिलन’ कार्यक्रमात बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बदामराव पंडित यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. पक्षातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, बाळराजे पवार, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बदामराव पंडित यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासह माधवराव निर्मळ यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षात त्यांचे यथोचित सन्मान राखले जाईल, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

error: Content is protected !!