बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) निघाला मोबाईल चोर!

‘झुकेगा नही साला’ म्हणणारा ‘बॉस’ सुरत पोलिसांसमोर हात जोडून म्हणाला ‘माफ करा’

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) निघाला मोबाईल चोर! ‘झुकेगा नही साला’ म्हणणारा ‘बॉस’ सुरत पोलिसांसमोर हात जोडून म्हणाला ‘माफ करा’; व्हिडिओ व्हायरल
लातूर: वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) याच्यावर आता मोबाईल चोरी आणि लुटीचा गंभीर आरोप सिद्ध झाला आहे. तपासणीच्या नावाखाली गुजरात राज्यातील सुरत शहरात त्याने दोन मोबाईल आणि दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची लूट केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर सुरत पोलिसांनी लातूर येथून रणजीत कासलेला अटक केली असून, गुन्हा कबूल करतानाचा आणि माफी मागतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले सुरत येथे गेला होता. या ठिकाणी त्याने तपासाच्या नावाखाली काही लोकांना धाकदपटशहा करत त्यांची जबरी लूट केली. या लुटीमध्ये दोन मोबाईल आणि सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम त्याने हिसकावून घेतली.
* या घटनेची तक्रार सुरत पोलिसांना मिळाली आणि त्यांना या लुटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला.
* तपासाअंती, गुजरात पोलिसांनी रणजीत कासले याला अटक करण्यासाठी लातूर शहरात दोन दिवस शोध मोहीम राबवली.
* अखेरीस, २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून लातूर पोलीस आणि गुजरात पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कारवाईत रणजीत कासलेला ताब्यात घेण्यात आले.
* सुरत पोलिसांनी कासले विरोधात गुन्हा दाखल केला होता.
‘पुष्पा’ स्टाईल ॲक्शन ते हात जोडून माफी
रणजीत कासले हा स्वतःला ‘बॉस’ म्हणवून घेत असे. वादग्रस्त विधानांसाठी आणि सोशल मीडियावर मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांवर थेट आरोप करण्यासाठी तो नेहमी चर्चेत राहिला आहे. अटकेपूर्वी जेव्हा गुजरात पोलीस त्याला ताब्यात घेत होते, तेव्हा त्याने ‘बॉसला अटक झाली’ असे सांगत ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘झुकेगा नही साला’ स्टाईल ॲक्शन करत गाडीत बसताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मात्र, सुरत येथे पोहोचल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. सुरत पोलिसांनी तपासाच्या नावाखाली धाकदपटशहा करत लोकांचे मोबाईल हिसकावून नेत असलेला त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ तसेच, गुन्हा कबूल करताना हात जोडून माफी मागत असलेला त्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळे, ‘झुकेगा नही साला’ म्हणणारा ‘बॉस’ पोलिसांसमोर नमल्याचे स्पष्ट झाले आहे.
जबरी घरफोडीतील आरोपींना मदत करण्याचा संशय
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडी प्रकरणात अटक असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले याच्याबाबत माहिती मिळाली होती. या आरोपींना मदत करणे किंवा इतर सहकार्य पुरवणे अशा स्वरूपाचा संशय असल्याकारणाने गुजरात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कायदेशीर पूर्तता करून गुजरात पोलिसांचे सहा जणांचे पथक त्याला सुरत भागातील पाल पोलीस स्टेशनकडे घेऊन गेले आहे.
वादग्रस्त इतिहास
रणजीत कासले याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मीक कराड प्रकरण यासह अनेक गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत त्याच्यावर सातपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, गुजरात पोलिसांचा हा आठवा गुन्हा असल्याचे सांगण्यात येत आहे. बडतर्फ झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल केले होते.

error: Content is protected !!