उमेदच्या दिवाळी फराळ महोत्सवाचे बीडमध्ये उद्घाटन



बीड दि.14 (प्रतिनिधी):
      बीड जिल्हा परिषदेच्या  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत उमेदच्या वतीने गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनाचे आयोजन दि.14 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.  बीड जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बचतगटाच्या खाद्य पदार्थाची व वास्तूच्या या विक्री प्रदर्शनात मसाले, विणकाम, लाकडी  वस्तु, खाद्य पदार्थ, आदी 13 स्टॉल उभारण्यात आले आहेत. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी या दिवाळी फराळ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
       यावेळी प्रकल्प संचालक श्रीमती सांगितादेवी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, लेखा व वित्त अधिकारी आबासाहेब घायाळ, कार्यकारी अभियंता (बांधकाम नं.1) मोमीन, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बीडकर, सहाय्यक लेखाधिकारी, उत्तम सातपुते, कट्टे, जोशी, यांचेसह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!