बीड दि.8 (प्रतिनिधी): बीड जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची कागदपत्राची तपासणी बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी ठेवण्यात आली होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांची हेळसांड झाली. अचानक ठिकाण बदलल्याने पहिल्या मजल्यावर तपासणीचे ठिकाण असल्यामुळे दिव्यांगाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रासह युआयडी तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना बीड जिल्हा परिषदेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
बुधवारी सकाळी 10.00 वाजता दिव्यांगानी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. अचानक रामचंद्र दिव्यांग शिक्षक, साधनव्यक्ती यांना जिल्हा स्काऊटभवन कार्यालयात जाण्याचे सांगितले. तर उर्वरित विभागाचे दिव्यांग कर्मचाऱ्यांना जिल्हा परिदेच्या सभागृहात थांबण्याचे सांगितले. सकाळी दहा वाजता सदर दिव्यांग कर्मचारी कागदपत्राची तपासणी व्हायला हवी होती. मात्र स्काऊट भवन येथे गेलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी तब्बल तीन तासाने म्हणजे दुपारी 1.00 वाजता सुरू झाली. याला तपासणी करण्यासाठी नियोजन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
चौकट
रॅम्प आणि लिफ्ट नसल्याने दिव्यांगाचे झाले हाल
बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहापर्यंत जाण्यासाठी रॅम्प नाही. जिल्हा परिषदेच्या इमारतीतील लिफ्ट सुरूच नसल्याने दिव्यांग कर्मचाऱ्यांना तपासणीच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी त्रास घ्यावा लागला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे दैनंदिन कामासाठी आणि सोनवण्यासाठी आलेल्या दिव्यांगा नाही कॅम्प अथवा लिफ्ट नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हा परिषद पप्रशासनाने योग्य ती दखल घेऊन सुविधा निर्माण करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.