एसपी’नी घडविले माणुसकी अन् सहृदयतेचे दर्शन; पोलीस कुटुंबीयांच्या बाळांसाठी पोलिस अधीक्षक जिल्हा रुग्णालयात दाखल

एसपी’नी घडविले माणुसकी अन् सहृदयतेचे दर्शन

पोलीस कुटुंबीयांच्या बाळांसाठी पोलिस अधीक्षक जिल्हा रुग्णालयात दाखल

बीड दि.19 (प्रतिनिधी):
        जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दैंनदिन व्यस्त कामातून वेळ काढून अंगरक्षक असलेल्या राऊत  यांच्या पत्नीची मुदतपूर्व प्रसुती झाली. बाळांना अतिदक्षता एनआयसीयु दाखल करण्यात आले.
      पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांचा शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. अधिकारी, कर्मचारी आणि अन्य मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आले होते. एस पी नवनाथ कवा त्यांना आपले अंगरक्षक पोलीस राऊत कुटुंबीयांची मदतपूर्व प्रसूती झाल्याचे समजले. त्यांनी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या समवेत  बाकी कामे बाजूला जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक शहाणे, समन्वयक डॉ. हनुमंत पारखे व तज्ञ डॉक्टरांची भेट घेतली. अंगरक्षक पोलिस कर्मचारी राऊत यांच्या बाळ आणि बाळाच्या आईच्या आरोग्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
      जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून मोठा व्याप आणि व्यस्त दिनचर्या असताना नवनीत कॉवत यांनी या भेटीतून आपल्यातील माणुसकी व  सहृदयतेचे दर्शन घडवले.
      बीड येथे रुजू झाल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. शिस्तप्रिय, कार्यतत्पर, सजग आणि मृदू  प्रसंगी कठोर आणि  ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याशी निष्ठा असलेला अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण होत आहे.
        कायदा, सुव्यवस्था,  शांतता राखण्यासाठीची उपाययोजना, आदी विविध कामाबरोबरच पोलिस, कर्मचारी- अधिकारी यांच्यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक कुटुंब प्रमुख म्हणून बारकाईने आणि गांभीर्यपूर्वक पाहत असल्याचे यावरून दिसून आले आहे.

error: Content is protected !!