बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी: 18 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद!

बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 46.1 मिमी पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 86 मंडळांपैकी 18 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेतीचं आणि जनजीवनाचं मोठं नुकसान झालं आहे.


यंदाच्या पावसाळ्याची सरासरी पाहिली असता, जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामातील अपेक्षित सरासरी पर्जन्यमान 566.1 मिमी आहे. या तुलनेत, आतापर्यंत जिल्ह्यात 539.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या 95.2% इतकी आहे, जी समाधानकारक मानली जाते.

error: Content is protected !!