पीएसआय दादासाहेब केदार यांनी प्रामाणिक आणि कर्तव्य भावनेतून उल्लेखनीय कार्य केले- एएसपी पांडकर


     
बीड दि.7 (प्रतिनिधी):
       पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब केदार यांनी पोलीस खात्यात प्रामाणिकपणे आणि कर्तव्य भावनेतून उल्लेखनीय कार्य केले. नोकरीच्या कालावधीतील त्यांच्या कार्याचे कौतुक करतो, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले.
       जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब नारायणराव केदार हे 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी बीड येथे आयोजित करण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर बोलत होते. या कार्यक्रमास माजी सभापती बाबुराव केदार, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्करराव केदार, समाज भूषण नितीन कोटेचा, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सचिन इंगळे, पोलिस उप निरीक्षक खटावकर, सेवानिवृत्त पीएसआय बाबासाहेब जायभाये, मिसाळ, माजी केंद्रप्रमुख तांदळे, वनक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे,  नारायण नागरे, केदार महामुनी,  यांच्यासह पोलीस अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, नातेवाईक आणि मित्र परिवारांची मोठी उपस्थिती होती.
     यावेळी बोलताना सेवानिवृत्त पीएसआय अरुण डोंगरे म्हणाले, केदार यांची पोलिस खात्यात पोलिस कर्मचारी ते अधिकारी अशी त्यांची प्रदीर्घ सेवा झाली. कार्यतत्पर, शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक अधिकारी .होऊन सुपरिचित आहेत. असे सांगून त्यांच्या आदर्श कुटुंबाविषयीची माहिती सांगितली. प्रामाणिक सल्ला देणारे, निष्ठा ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून दादासाहेब केदार परिचित आहेत, असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी कालिदास बडे यांनी केले. सेवानिवृत्त पीएसआय अरुण डोंगरे यावेळी बोलतांना म्हणाले, सेवानिवृती कार्यक्रमामुळे कौटुंबिक व सामाजिक काय परिस्थिती आहे, हे समजते. असे कार्यक्रम घेतल्याने चांगला पायंडा पडतो, असे सांगून त्यांनी केदार कुटुंब विषयी गौरवोद्गार काढले.
    सरपंच रामदास हंगे यांनी, संस्कृती महत्वाची आहे कर्म हेच पुण्य आहे. ग्रामीण भागात केदार यांचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम ठेवावेत. असे सांगून सध्या परिस्थितीवर अप्रतिम विवेचन केले. यावेळी समाजभूषण नितीनचंद्र कोटेचा,  बाबुराव केदार, भास्कर केदार, वेदशास्त्रसंपन्न बाळुदेवा, पीएसआय विजय जाधवर परमेश्वर सानप, डोंगरे सर, आदींची समयोचित भाषणे झाले.
     यावेळी केदार यांच्या सून प्रीती केदार यांनी दादासाहेब केदार मार्गदर्शक, आधारवड आहेत. आई- वडिलांचे प्रेम त्यांच्याकडून मिळते. असे सांगून उपस्थितांच्या आश्रुला बांध फुटला.
      यावेळी दादासाहेब केदार यांनी, पोलीस खात्यात  कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन कुटुंबाला दुय्यम स्थान दिले, असे सांगून यावेळी त्यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सागर दादासाहेब केदार यांनी, आम्ही वडिलांच्या आदर्शातून कसे घडलो, हे सांगितले. तर आभार प्रदर्शन करताना विशाल दादासाहेब केदार यांनी वडिलांनी आपल्याला जीवनाच्या ट्रॅकवर आणण्याचे सांगितले. आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.
       केदार परिवाराच्या वतीने प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादासाहेब केदार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक माधव चाटे यांनी केले.

error: Content is protected !!