पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब केदार यांचा रविवारी सेवा गौरव सोहळा
बीड दि.7 (प्रतिनिधी):
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब केदार हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता बीड येथील नगर नाका जवळील हॉटेल ऑलीव हॉटेल येथे होणार आहे.
या कार्यकर्मास वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, नातेवाईक आणि मित्र परिवारांची उपस्थिती राहणार आहे.
पोलिस खात्यात पोलिस कर्मचारी ते अधिकारी अशी त्यांची प्रदीर्घ सेवा झाली. पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब केदार हे कार्यतत्पर, शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक अधिकारी .होऊन सुपरिचित आहेत.