डॉ रसिका पारगावकर यांच्या आयुर गायनॅक हॉस्पिटल चे थाटात उदघाटन
बीड दि.6 (प्रतिनिधी):
रुग्णालयात आलेला रुग्ण हा दुरुस्त तर व्हावाच पण भविष्यात तंदुरुस्त रहावा यासाठी डॉ रसिका पारगावकर यांच्या आयुर गायनॅक या हॉस्पिटलचा उपयोग व्हावा आणि डॉ. रसिका तो निश्चितपणे करेल, असा विश्वास सद्गगुरू सुरेश महाराज रामदासी साडेगावकर महाराज यांनी व्यक्त केला.
बीड शहरातील कॅनॉल रोडवर अंबिका चौकाच्या जवळ डॉ. रसिका स्नेहा संतोष पारगावकर यांच्या आयुर गायनॅक या हॉस्पिटल चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास ह.भ.प. विनायक महाराज पाटांगणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत, डॉ. अशोक थोरात, डॉ सुभाष जोशी, प्राचार्य दीपाताई क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, प्रा. सतीश पत्की, संपादक गंमत भंडारी, संपादक दिलीप खिस्ती यांची यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुरेश महाराज साडेगावकर म्हणाले, ‘ अभ्यासोनी प्रकटावे’ असं म्हणतात, त्याचप्रमाणे पारगावकर कुटुंब डॉक्टर, इंजिनियर, शैक्षणिक क्षेत्रात पारंगत आहे. रसिकाने जे हॉस्पिटल सुरु केले त्याचा बीड वासियांना मोठा फायदा होईल. आयुर्वेदात शमी पत्राला खूप महत्व आहे. गणेशाला दुर्वा वहिल्या जातात. कारण त्याला सुद्धा आयुर्वेदात मोठे महत्व आहे, रसिका यांच्या माध्यमातून बीड शहरात आयुर्वेदिक दालन सुरु झाले आहे, तिची भरभराट व्हावी, असे आशीर्वाद साडेगावकर महाराज यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, डॉ. रसिका यांनी हे बीड शहरातील पहिलेच आयुर्वेदिक स्त्री रोग चिकित्सा रुग्णालय असून, माता, महिला आणि तरुणींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्नेहाताई पारगावकर, संतोष पारगावकर, आशुतोष पारगावकर, सिद्धांत देशमुख, अभय पारगावकर, संदीप पारगावकर यांनी केले. सुत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.
रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी पारगावकर यांचे नातेवाईक मित्रपरिवार स्नेहांकित मोठ्या संख्येने उपस्थित होते.