आरक्षणासाठी सरकारची धावपळ, मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस

मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता पुन्हा याच संदर्भात खलबतं झाली.
सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या विचारात आहे, पण त्यात काही कायदेशीर अडचणी येत आहेत. न्यायालयाच्या काही जुन्या निकालांमुळे हा मार्ग सोपा नाही. त्यामुळे या समस्येवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
दरम्यान, मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने अद्याप काही ठोस निर्णय घेतला नसल्याने जरांगे यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आजपासून (१ सप्टेंबर) पाणी पिणंही बंद केलं आहे.
या पार्श्वभूमीवर, आज सरकारकडून जरांगे यांना एक नवा प्रस्ताव पाठवला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावामध्ये काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण यावरच पुढील मार्ग अवलंबून असेल.

error: Content is protected !!