सिंधुदुर्ग | वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊतांनी(sanjay raut) विचारला होता. याला भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा?, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा? असा सवाल राणेंनी विचारला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच महाराष्ट्रातील सरकार राहील, असा दावा नारायण राणेंनी केला. तसेच तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असं भाकित राणेंनी वर्तवलं आहे.