गेवराईतील हाके पंडित राड्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट; जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी, पुढील 15 दिवस विविध आंदोलने निदर्शनावर बंदी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच काल बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांत राडा झाला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. पुढील पंधरा दिवस कुठलेही आंदोलन निदर्शने होणार नाहीत. एवढेच नाही तर पाच पेक्षा अधिक जमाव एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आला आहे. यादरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिला आहे