मोठी बातमी: मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली, दरवाजा तोडून बाहेर


बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात ते थोडक्यात बचावले. एका खासगी रुग्णालयात लिफ्टमध्ये असताना ती अचानक कोसळली.

मनोज जरांगे पाटील हे बीडमधील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी ते काही कार्यकर्त्यांसह लिफ्टमध्ये चढले. मात्र, लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे ती ओव्हरलोड झाली आणि पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळली.

या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. लिफ्टचा दरवाजा तोडून जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे सहकारी सुखरूप बाहेर पडले. या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांसाठी ही घटना काळजाचा ठोका चुकवणारी होती, पण सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत.

error: Content is protected !!