बीडच्या पोरीचा पुण्यामध्ये धुमाकूळ! वाटले ५००० किलो मोफत चिकन



पुणे:   रविवारी पुणेकरांना एका अविस्मरणीय मेजवानीचा अनुभव मिळाला. पुण्यातील धानोरी परिसरात राहणारे धनंजय जाधव आणि त्यांच्या पत्नी पूजा(मोरे) जाधव यांनी तब्बल ५००० किलो चिकनचे मोफत वाटप करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे, पूजा या बीडच्या मूळ रहिवासी असून, त्यांनी पुण्यात येऊन पतीसोबत केलेल्या या अनोख्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

एरवी चिकन मटणाच्या दुकानांबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा नेहमीच्याच असतात. मात्र, धनंजय आणि पूजा यांनी वाटलेल्या मोफत चिकनमुळे अनेकांना दिलासा मिळाला. ‘ओळखपत्र दाखवा आणि चिकन मोफत न्यायचे’ असा नियम त्यांनी या वाटपावेळी पाळला.

पुणेकरांचा ‘काही नेम नाही’ असे म्हटले जाते, आणि आखाडात मोफत चिकन मिळाल्याने ते स्पेशल झाल्याचे बोलले जात आहे. बीडहून आलेल्या पूजा यांनी आपल्या पतीसोबत हा आगळावेगळा उपक्रम राबवून पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु, आखाडाच्या निमित्ताने केलेली ही अनोखी समाजसेवा नेमकी कशासाठी, केवळ सामाजिक कार्यासाठी की यामागे काही राजकीय हेतू दडला आहे, याबाबत सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या उपक्रमाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय जाधव आणि बीडच्या पूजा मोरे यांनी राबवलेला हा उपक्रम सध्या पुण्यात कौतुक आणि कुतूहलाचा विषय बनला आहे.

error: Content is protected !!