ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळंके यांची छत्रपती संभाजीनगरला बदली;
बीडला एसीइओ जाधव यांची नियुक्ती

ॲडिशनल सीईओ वासुदेव सोळंके यांची छत्रपती संभाजीनगरला बदली;
बीडला एसीइओ जाधव यांची नियुक्ती

डेप्युटी सीईओ मोकाटे यांची किनवटला बदली

बीड दिनांक 15 (प्रतिनिधी):
महाराष्ट्र विकास सेवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक गट संवर्गाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने निर्णय केले असून केले आहेत यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची बदली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे. तर बीड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी धाराशिव येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि.पी. जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके हे तात्काळ मंगळवारी कार्यमुक्त झाले असून ते संभाजीनगर येथे आज मंगळवारी रुजू होणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके हे 2004 मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी या तत्सम पदावर रुजू झाले प्रशिक्षणार्थी कालावधी संपल्यानंतर त्यांची जालना जिल्ह्यातील मंठा येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी यापूर्वी जालना औरंगाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली. वासुदेव सोळंके हे अहिल्यानगर येथून पदोन्नतीवर बीड येथे 2021 मध्ये रुजू झाले. सन 2021 ते 20 25 या कालावधीमध्ये त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद साधणारे आणि अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. शिस्तप्रिय, शांत, संयमी आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून सोळंके हे सुपरिचित आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांची बदली नांदेड जिल्ह्यात किनवट येथे झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी येथील किशोर काळे यांची नियुक्ती झाली आहे.

error: Content is protected !!