AI तंत्रज्ञानाचा वापर करून कॉल, बनावट सही आणि 3.2 कोटींचा निधी घोटाळा: प्रसाद लाड यांच्या नावाचा गैरवापर उघड

बीड – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी (government fund fraud) बीड जिल्ह्यात वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर घोटाळ्याबाबत स्वतः आमदार लाड यांनी विधान परिषदेच्या सभागृहात माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. (fake government scheme misuse, MLA impersonation)

प्रकरणानुसार, रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला प्रसाद लाड यांच्या नावाचा बनावट लेटरहेड (fake MLA letterhead) व त्यावर खोटी सही प्राप्त झाली होती. त्यात बीडसाठी निधी तातडीने वर्ग करण्याची सूचना होती. विशेष म्हणजे, आरोपींनी लाड यांच्या आवाजात बनवलेला एक AI कॉल (Artificial Intelligence voice fraud) वापरून हा आदेश अधिक प्रभावी बनवला होता.

त्या कॉलनंतर तातडीने निधी वर्ग करण्यात आला. मात्र संबंधित अधिकाऱ्याला शंका आल्याने त्यांनी थेट आमदार लाड यांच्याशी संपर्क साधत खात्री केली. त्यानंतर या सायबर फसवणुकीचा प्रकार (digital signature forgery, AI impersonation) उघडकीस आला.

याप्रकरणी लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस आयुक्त व मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या या फसवणुकीच्या तपासात 4 जणांची नावे समोर आली असून, त्यातील एका व्यक्तीचे नाव बंडू असून तो एक सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. यावर पुढील तपास सुरू आहे. (Beed district fund scam, MLA Prasad Lad impersonation, political scam Maharashtra)

लाड यांनी स्पष्ट केले की, “माझ्या नावाचा वापर करून सरकारी यंत्रणेला फसवून निधी चोरी करण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव पुढे आल्यानंतर अधिक सावध झालो.”

error: Content is protected !!