बीडनंतर कोल्हापुरातही संतापजनक घटना – शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, पालक आक्रमक



बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक छळ प्रकरणाचे पडसाद अजूनही शांत झालेले नाहीत, तोच राज्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील सेनापती कापसे परिसरातील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, शिक्षण क्षेत्राला पुन्हा एकदा काळिमा फासला आहे.

या घटनेने परिसरात तुफान संताप उसळला आहे. पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी थेट शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत वातावरण नियंत्रणात आणले असून, संबंधित शिक्षकाविरोधात POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

स्थानिक नागरिक आणि पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या शिक्षकाला त्वरित निलंबित करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. कोल्हापुरातील हा प्रकार आणि बीडमधील उमाकिरण कांडाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या धोरणांचा आढावा घेण्याची वेळ आता आली आहे.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सरकारकडून शिक्षण संस्थांमध्ये मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत.

error: Content is protected !!