‘उमाकिरण’ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ


बीड, १ जुलै, ( प्रतिनिधी):बीड येथील ‘उमाकिरण’ शैक्षणिक संकुलातील लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना न्यायालयाने आता ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात आणखी एका आरोपीचा समावेश झाल्याने खळबळ उडाली आहे. हा नवीन आरोपी दुसऱ्या जिल्ह्यातील असल्याने, या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

error: Content is protected !!