बीड: बीड जिल्हा पोलिसांनी उमा किरण शिक्षण संकुलात घडलेल्या एका घटनेसंदर्भात जनतेला जाहीर आवाहन केले आहे. या संकुलातील कथित गैरप्रकारांबाबत शिवाजीनगर बीड पोलिसांनी २६ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात कुणी फसवले गेले असेल किंवा पीडित असेल, तसेच कुणाकडे या प्रकरणाबाबत माहिती किंवा पुरावे असतील, तर त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांनी मा. पोलीस अधीक्षक, बीड किंवा तपासणी अधिकारी, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. शिवाजी नगर बीड यांना प्रत्यक्ष भेटावे. तसेच, खालील मोबाईल क्रमांकांवर निनावीपणे माहिती व पुरावे सादर करता येतील. माहिती व पुरावे सादर करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.
संपर्कासाठी मोबाईल नंबर:
१. नवनीत कवंट, पोलीस अधीक्षक, बीड मो.न. ९२२५०९२८००
२. के.एस. पवार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शिवाजी नगर बीड मो.न. ९२२५०९२८११