गावठी कट्ट्याससह दोघा आरोपींना अटक;
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी



बीड दि.14 (प्रतिनिधी):
       गावठी पिस्तूलसह दोघा आरोपींना जेरबंद करण्यास शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे.  सदर कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी केली.
      या संदर्भात पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना दोन संशयित इसम  एम. एच. 14 एचए 1608 या दुचाकीवर क्रिस्टल लावून फिरत असल्याचे गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी गोविंद नगर सिमेंट रोड भागात आपल्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ पाठवले. सदर पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर भागात सापळा लावला समोरून वाहनावर येत असलेल्या इसमाना थांबण्याचा इशारा केला, मात्र ते चालू दुचाकी तेथेच सोडून त्यांनी कारपरा नदीत पलायन सुरू केले. सुमारे दोन ते तीन किलोमीटर नदीत पाठलाग केल्यानंतर  सदर इसमांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या गुन्हेगाराची कसोशीने विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे सुयोग उर्फ छोटा मच्छिंद्र प्रधान (वय 25) विवेकानंद शाळेजवळ, गोविंद नगर, बीड आणि स्वप्निल उर्फ आदित्य उर्फ सोपानदार अशोक पाखरे (वय 30) रा. राहणार भिंगार जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले. संबंधिताची अंगझडती घेतली असता, मॅग्निस नसलेल्या गावठी पिस्टल व मोटरसायकल  जप्त करण्यात आला.
    यातील छोट्या उर्फ मच्छिंद्र यांच्याविरुद्ध सहा गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर सोपानदार याचे विरुद्ध आठ गुन्हे दाखल आहेत.
   सदर कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,  प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी कमलेश मीना, यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगहु, सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

error: Content is protected !!