बीड दि.10 (प्रतिनिधी):
एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा येथील तथाकथित शिष्यव्वकेशव गीते हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि आपल्याला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराज मठाधिपती एकनाथ महाराज मठ, सासुरा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
या संदर्भात दिनांक 10 जून 2025 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ह.भ.प. रतन महाराज, एकनाथ संस्थान, सासुरा व त्यांचे सुमारे 100 भाविकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 70 वर्षापासून रतन महाराज संस्थांनच्या माध्यमातून परिसरातील जनतेची प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. सुमारे 100 वर्षाचे वय झाले असून सासुरा येथे उत्तराधिकारी म्हणून गावकरी व इतरांनी केशव गीते याच्या नावाला संमती दिली मात्र संबंधिताने संस्थांनच्या नियम व अटी अधीन राहून काम केले नाही. तसेच नियम पाळण्याबाबत हमीपत्र लिहून दिले नाही. केशव गीते अशोभनीय आणि उत्तराधिकारी अथवा महाराज या नावाला काळीमा फासण्याचे कृत्य करत आहे. आपणाला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. मस्साजोग सरपंचप्रमाणेच आपले हातपाय तोडून जेसीबीने खड्डा करून पुरीन, अशा प्रकारचे धमकी संबंधितांनी दिली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून आपल्याला संरक्षण द्यावे, अशी मागणी मला देतात महाराज मुंडे आणि त्यांच्या भक्तांनी केली आहे.