बटाट्याच्या भाजीला विरोध; पतीला त्याच्या पत्नीने बेदम चोप , उजवा खांदा फ्रॅक्चर

अहमदाबाद: रात्री जेवणात केलेली बटाट्याची भाजी नको म्हणून विरोध करणाऱ्या पतीला त्याच्या पत्नीने बेदम चोप दिल्याची घटना अहमदाबादमधील वासना परिसरात घडली. या प्रकरणी पतीने शनिवारी पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. हर्षद गोहेल हा ४० वर्षीय तरूण मधुमेहग्रस्त आहे. आहारात बटाटा खाणे टाळावे असा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे त्याने बटाट्याची भाजी खाण्यास नकार दिला. त्यामुळे पत्नीने त्याला मारहाण केली.

या प्रकरणी हर्षद याने वासना पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, हर्षद याला चार मुली आहेत. वासना परिसरातील सोराईनगर परिसरात तो राहतो. त्याची पत्नी तारा गोहेल हिच्याशी त्याचे भांडण झालं. हर्षद हा मजुरीची कामे करतो. शुक्रवारी रात्री तो घरी आला. त्याने पत्नी ताराला आज रात्री जेवणात काय केलं आहे, अशी विचारणा त्याने तिला केली. चपाती आणि बटाट्याची भाजी केल्याचं तिनं सांगितलं. त्यावर हर्षदनं बटाट्याच्या भाजीला विरोध केला. तू बटाट्याची भाजी का केलीस? मला बटाट्याची भाजी खायची नाही, असे तो म्हणाला. तिला त्याचा राग आला. तिनं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – भारतीय सुप्रीम कोर्टात भरती २०२०

ती शिवीगाळ करत असल्याने हर्षदने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिने धोपाटण्याने मारहाण केली, असे हर्षदने तक्रारीत म्हटले आहे. त्याने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ते ऐकून त्याच्या कुटुंबातील काही जण घरी धावत आले. त्यांनी ताराच्या तावडीतून त्याची सुटका केली. त्याला व्ही. एस. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीत त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वासना पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ४३२ पदांची भरती 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!