गेवराई, दि. २७: गेवराई शहरात काल रात्री (दि. २६) ११:३० वाजण्याच्या सुमारास गढी परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात शहरातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बंद पडलेली गाडी आणण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
या अपघातात बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर, आणि सचिन ननवरे या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गेवराईच्या आरोग्य विभागाने दिली आहे. अपघाताची बातमी कळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.