लग्नानंतर फिरण्यासाठी कश्मीर गेले; हातावरची मेहंदी सुकण्याच्या आधीच  पतीचा हात सुटला: पहलगाम हल्ल्याची हृदयद्रावक कथा

विदारक! पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवले, इंटरनेटवर शोक व्यक्त

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विदारक दृश्यं समोर आली आहेत. पर्यटक आणि स्थानिकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी निर्दय गोळीबार केला. यात एका नवविवाहित जोडप्याचेही आयुष्य उध्वस्त झाले. हल्लेखोरांनी नवऱ्याचा धर्म विचारल्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आल्याचा दावा पत्नीने केला आहे. 

मृत पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेल्या महिलेचा हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया उमटवत आहे. इंटरनेटवर शोक व्यक्त होत असून #JusticeForVictims आणि #PahalgamAttack सारखी हॅशटॅग्स ट्रेंड होत आहेत. देशभरातून या निर्दय हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. नागरिक न्याय आणि सुरक्षिततेची मागणी करत असून, या अमानुष हल्ल्याची कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. 

हे हल्ले पुन्हा एकदा शांततेच्या मूलभूत गरजेचा जोरदार संदेश देतात. अशा घटनांनी अस्वस्थ होणाऱ्या जनतेच्या भावना प्रशासनाने गांभीर्याने घेऊन ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा!

error: Content is protected !!