शासनाने केला वरिष्ठ प्रशासकीय बदल
बीड दि.22 (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे बदल जाहीर केले असुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची या बदली करण्यात आली आहे. पाठक यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार, या पदावर पूर्वी नियुक्त असलेले सी. के. डांगे यांच्या बदलीचे आदेश शासनाने रद्द केले असून, संबंधित पद आता वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. विवेक जॉन्सन यांना बीड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यभार हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.