बीडच्या शिरूर तालुक्यात गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात हा नारळी सप्ताह होतोय. त्यामुळे आज (19 एप्रिल) पुन्हा मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच अध्यात्मिक व्यासपीठावर पाहायला मिळतील. शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा 93वा नारळी सप्ताह पार पडला. आज या सप्ताहाची सांगता होत असून काल्याच्या कीर्तनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित असतील. साधारण साडेअकरा वाजता हे दोघेही हेलिकॉप्टरने घाटशीळ पारगाव येथे दाखल होतील. या निमित्य ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी इथे करण्यात आली आहे.