महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव रेहान कुरेशी असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे केज तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत आणि आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आला आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, धाकदपट, आणि किरकोळ कारणांमुळे होणाऱ्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील शांतता धोक्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर प्रकाश टाकला आहे.