पत्नी आणि मित्राचा कट: उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव, प्रशासनात खळबळ




सातारा: छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना पत्नी आणि तिच्या मित्राच्या मदतीने जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. पत्नीने तिच्या आई, भाऊ, घरातील मोलकरीण, आणि मित्राच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले.

पत्नीवर जादूटोणा, विषप्रयोग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासोबतच, पतीवर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस आयुक्त रणजित पाटील पुढील तपास करत आहेत.

फिर्यादीचा तपशील

देवेंद्र कटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा 2000 साली सारिका साहेबराव देशमुख हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. पण एमपीएससी परीक्षेत लाभ घेण्यासाठी सारिकाने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. शासनाने लग्नानंतर लाभ देणे बंद केल्याचे सांगितल्यानंतर तिचे वागणे उद्धट झाले.

2013 मध्ये कटके यांना संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर पत्नीचा स्वभाव अधिकच कठोर झाला. 2021 मध्ये पतीच्या आग्रहामुळे पत्नीला जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात एक इंग्रजी शाळा सुरू करून दिली, ज्याचा खर्चही पतीनेच केला.

कटाचा उलगडा

3 मार्च 2025 रोजी, जीपीएस लोकेशनद्वारे देवेंद्र कटके यांना पत्नीच्या संशयास्पद हालचालींची जाणीव झाली. कॅम्ब्रिज चौकात पत्नीच्या गाडीशेजारी विनोद उबाळेची कार उभी होती. विचारणा केल्यावर उबाळेने जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर बंदूक रोखली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपींची ओळख

या प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उबाळे हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटही चालवले आहे. या प्रकरणात पत्नी सारिका कटके, मित्र विनोद उबाळे, मेव्हणा आतिश देशमुख, सासू सुवर्णा देशमुख, व मोलकरीण छायाबाई गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

error: Content is protected !!