वाल्मिक कराडवर तुरुंगात हल्ला; बबन गीते सोशल मीडियावर सक्रिय, बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न



वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीडच्या तुरुंगात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी हल्ला केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

या प्रकरणात बबन गित्ते याचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. बबन गित्ते, जो बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी आहे, तो गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे. मात्र, त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकून वाल्मिक कराडला इशारा दिला आहे. या पोस्टमुळे बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, तुरुंग प्रशासनाने मारहाणीच्या वृत्ताला फेटाळले आहे. परंतु, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण बबन गित्ते फरार असूनही तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!