बीड दि.16 (प्रतिनिधी):
आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथे एका युवकाच्या निर्घृण खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास बनसोडे (वय २५, रा. जालना) हा गेल्या दोन वर्षांपासून भाऊसाहेब क्षिरसागर यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने झाले असून ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचे फोटो सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी व्हायरल झाल्याने जिल्हासह महाराष्ट्र हादरला होता. ज्या प्रकारे मारहाण करून हत्या करण्यात आली होती त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. देशमुख यांना ज्या प्रकारे मारहाण करून हत्या करण्यात आली होती त्यापेक्षाही क्रूर हत्या आष्टी तालुक्यामध्ये विकास बनसोडे (वय 25 वर्षें) ट्रक ड्रायव्हर, याला 2 दिवस बांधून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाआहे.
या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे कामास होता. हा मुळगाव जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील रहिवासी होता.त्याला दोन दिवस बांधून मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.आष्टी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या भाऊ आकाश बनसोडे याला फोन करून माहिती दिली की भावाला घेऊन जा नाहीतर आम्ही त्याला जिवंत मारू अशी धमकी दिल्याने पिंपरी घुमरा येथे गेलो असता त्याना सांगण्यात आले की भावाला कडा आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. त्यामुळे कडा आरोग्य केंद्रात जाऊन पाहिले असता विकासाचा मृतदेह आढळून आला व मयताच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसल्याने याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली पोलीस पुढील तपास करत आहेत. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा, या भागातील नागरिक करत आहेत.