सिलेक्टिव्ह निषेध चालणार नाही” – फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रचंड गदारोळ झाला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन करणारे विधान केल्यामुळे त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या प्रकरणामुळे सभागृहात राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिलेक्टिव्ह निषेधाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली.


सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. त्यांनी ठामपणे सांगितले की, “अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकू. मात्र, विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा कधी निषेध केला का? आव्हाड म्हणतात की, औरंगजेब होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. पण यावर कोणीच काही बोलत नाही.”

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारत असेही विचारले, “सिलेक्टिव्ह निषेध करणे योग्य आहे का? तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘Discovery of India’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले, त्याचा निषेध करण्याची हिंमत दाखवली आहे का? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

error: Content is protected !!