सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्तभेट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन (Santosh Deshmukh Murder Case) आमने-सामने आलेले भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एका खासगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. साधारण चार-पाच दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या कोठडीत आहेत. सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असताना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

दरम्यान, या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, “हे सर्व सरप्राईजिंग आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे. पण ही अतिशय गंभीर बाब आहे “.

error: Content is protected !!