सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये- सचिन खरात


भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नये अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे ज्या पोलिसांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला मारहाण केली ज्या पोलिसांनी निकिता वाटोरे यांना मारहाण केली. ज्या पोलिसांनी आमच्या सुशिक्षित भीमसैनिकांना जबर मारहाण केली त्या पोलिसांची बाजू भाजप आमदार सुरेश धस घेत आहात का? त्यामुळे भाजपा आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणांमध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंबेडकरी जनता आणि आंबेडकर नेते खंबीर आहोत, असं सचिन खरात यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!