दिल्लीचे निकाल येताच नायब राज्यपालांचे आदेश, मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये


दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवत, 27 वर्षांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पुनरागमन केलंय. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

दिल्लीच्या निकालानंतर नायब राज्यपालांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. सचिवालयातून कोणताही कॉम्प्युटर हार्डवेअर आणि दस्ताऐवज बाहेर जाता कामा नये, अशी नोटीस नायब राज्यपालांकडून जारी करण्यात आली आहे. सरकारी डेटा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवून सचिवालय पूर्णपणे सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीतील विधानसभेच्या एकूण 70 जागांपैकी भाजपने 48 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवलंय, ज्यामुळे त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. आम आदमी पक्षाला मात्र 22 जागांवर समाधान मानावे लागले असून, काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.

दिल्लीवासीयांनी त्यांच्या मतदानातून स्पष्ट केले की, बार-बार झूठे वादांवर ते विश्वास ठेवणार नाहीत. जनतेने त्यांच्या मतांद्वारे गंदी यमुना, पीने का गंदा पानी, टूटी सड़कें, ओवरफ्लो होत असलेले सीवर आणि प्रत्येक गल्लीत उघडलेल्या शराब ठेकों यांची उत्तरे दिली आहेत.

error: Content is protected !!