येत्या काळात बीड जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नसलेल्या परिस्थितीत, भाजपने आपल्या काही मंत्र्यांना संपर्कमंत्री म्हणून नेमणूक केली आहे. या मंत्र्यांकडे पक्ष, संघटना आणि सरकारमधील संपर्काचे काम असेल. त्यानुसार राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पक्षाच्या बैठकीत या संपर्कमंत्र्यांची घोषणा केली. ज्या जिल्ह्यांमध्ये इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत, तेथे भाजपने मंत्रिमंडळातील आपले मंत्र्यांना संपर्कमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. या मंत्र्यांकडे त्या जिल्ह्याचे पालकत्वच राहणार आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पंकजा मुंडे यांनी या नवीन जबाबदारीचे स्वागत करताना, ते निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे.