प्राॅपर्टीच्या वादातून येथील एका तीस वर्षीय विवाहीतेचा निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेसह इतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझीपुरा येथील हिना माजीद खान (वय 30) ही विवाहीता पतीसह घरात असताना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिच्या पहिल्या पतीच्या नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून हल्ला चढवला.
यात इंजेक्शनच्या सुया, लोखंडी राॅड व चाकुद्वारे हिना खान वर वार करुन तीला ठार करण्यात आले. तर सोबत असलेला तिचा पती हा ही या हल्ल्यात जखमी झाला असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हिनाचा पती सय्यद माजीद सय्यद कय्युम याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह इतर अकरा जणांवर भांदवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सपोनि शिवाजी नागवे करीत आहेत.