या भागातील इतिहास लक्षात घेता…. आता अपेक्षा कमी आहे- संदिप क्षीरसागर

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडेल अशी अपेक्षा आता कमी आहे. या भागातील इतिहास लक्षात घेता, जर तो सापडायचा असता तर पोलिसांना सापडला असता, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे बोलताना, मी पहिल्यापासून या प्रकरणात सीडीआर तपासण्याची मागणी करत आहे. काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहेत, आणि साखळी जुळत आहे. माध्यमांनी दाखवलेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, तेही पुढे येत आहेत, आणि आणखी बरेच लोक पुढे येतील.

आमदार सुरेश धस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांना बोलणार आहोत. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर उतरले आहेत, याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे. प्रशासनाला मोकळा श्वास देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. त्यांना सरेंडर होण्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, हे फक्त मंत्रिपद असल्यामुळेच त्याला संरक्षण मिळाले आहे. वाल्मीक कराडला पुण्यात कोणत्या रुग्णालयात दाखल केले गेले, आणि त्या काळात कोण त्याला भेटायला गेले याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!