परळी तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी भरत गित्ते यांची टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार


परळीचा मुलगा भरत गित्ते यांच्या यशाने बीड जिल्ह्याचे नाव उंच

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एका महत्त्वपूर्ण घोषणेने बीड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. परळी तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी भरत गित्ते यांची टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्याला 1200 हून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेनुसार, कंपनी महाराष्ट्रात सुपा आणि अहिल्यानगर येथे अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशनचे उत्पादन करणारे कारखाने उभारणार आहे. या प्रकल्पामुळे राज्य सरकारला उत्पादन क्षेत्रात मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

या यशस्वी करारासाठी भरत गित्ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. गित्ते यांनी एका छोट्याशा गावातून उद्योग क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाने तरुण पिढीला प्रेरणा मिळाली आहे.

राज्य सरकारने या प्रकल्पाला पाठिंबा देऊन उद्योगपतींना प्रोत्साहन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!