दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्री नियुक्ती प्रकरणात एकाच दिवसात मोठा उलथा-पालथा झाला आहे. शनिवारी (दि.19) जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्री यादीत नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला सरकारने अचानक स्थगिती दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार, “नाशिक” आणि “रायगड” या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीन आदिती तटकरे आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांना रायगड तर महाजन यांना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती.

error: Content is protected !!