राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे राहणार गैरहजर, कारण आलं समोर

आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत. नुकतंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

error: Content is protected !!