बचत गटामुळे आर्थिकदृष्ट्या जीवनमान उंचावले- जिल्हाधिकारी अविनाश पाठक
बीड दि.17 (प्रतिनिधी):
जिल्ह्यात बचतगट विकसित झाले आहेत. बचतगटामुळे आर्थिक दृष्ट्या मोठी मदत झाली आहे. बचत गटांनी वस्तू निर्मितीमध्ये आंबेसेटर ब्रँड निर्माण केला. पाककला मोठा अभ्यासक्रम आहे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, जिल्हा परिषद बीड समोरील मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे ‘जिल्हास्तरीय मिनी सरस’चे भव्य विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांचे हस्ते गुरुवारी करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पाठक म्हणाले, महिलांमध्ये उद्योजक बनवण्याचे मोठे साधन आहे. इच्छाशक्ती नसेल तर क्षमता असतानाही पैसे परतफेड लोक करत नाहीत. परंतु अलीकडे आर्थिक शिस्त अधिक चांगली करा. उपक्रम चांगला चालू आहे. बँकाही सहकार्य करत आहेत, असे सांगून जिल्ह्यातील बचत गटाच्या कार्याविषयी जिल्हाधिकारी पाठक यांनी समाधान व्यक्त करून बचतगटाच्या महिलांचे भरभरून कौतुक केले.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी बचत गटातील स्टॉलचे आणि बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थांची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती संगीतादेवी पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी बचतगटाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मीनाक्षीताई मुंडे, परळी आणि यमुनाताई सोनवणे यांनी बचतगटाची भरारी विषयी अनुभव कथन केेले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहपरिवारासह भेट देऊन अधिकाधिक खरेदी करून गरीबातील गरीब कुटुंबातील गटाच्या माध्यमातून उद्योजक महिलांना प्रदर्शनास मोठ्या उत्साहाने खरेदी करून प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा व्यवस्थापक शकील शेख व प्रमोद देशमाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक मुरारी सावंत, अधिक्षक धापसे, आशा पवार, अश्विनी खेडकर, सहाय्यक लेखाधिकारी कट्टे, जाधव, जोशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उमेद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रदर्शनात लखपती दीदी, परसबागचा डेमो प्रदर्शनाचे आकर्षण आहे. इतर जिल्ह्यातून 3, विविध खाद्यपदार्थ व शोभेच्या वस्तूचे 98 व जेवण व्हेज, नॉन-व्हेज चे 16 स्टॉल असे एकूण 114 उद्योजक समूहांनी सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण कलाकृती, विविध हस्तकला सुंदर कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य ग्रामीण भागातील दीदींना स्थानिक हस्तकला कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जिल्ह्याचे मिनी सरस दि. 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2025′ या कालावधीमध्ये बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण , जिल्हा परिषद समोर सकाळी 9.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानातर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात इंटेन्सीव पद्धतीने दारिद्य्र निर्मुलनाचे प्रभावीपणे काम सुरु आहे. स्वयंसहाय्यता समूहांना शासनाने वितरीत केलेल्या खेळते भांडवल, समुह गुंतवणूक निधी तसेच बँक कर्ज या माध्यामातून महिलांनी विविध उद्योग व्यवसायाची निर्मिती केली आहे. स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य महालक्ष्मी सरस व जिल्हास्तरावर जिल्हा मिनी सरस प्रदर्शानाचे भव्य आयोजन करण्यात येते, त्यानुसार जिल्ह्याचे मिनी सरस आयोजित करण्यात आले आहे .
जिल्हातील उमेद अभियानातर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समुहातील होतकरू महिलांनी तयार केलेले उत्पादित मालाच्या मराठवाड्यातील विविध आकर्षक वस्तू– मसाले, चटण्या, पापड, लोणचे, येसूर, आवळा कॅन्डी, गृहपयोगी वस्तू , हस्तकला, लाकडी वस्तू , लोकरीच्या वस्तू , शोभेच्या वस्तू , विविध खाद्य पदार्थ, खमंग स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी घरगुती पद्धतीने तयार केलेले गावरान जेवण, दही धपाटे यासह अनेक नानाविध प्रकारांच्या वस्तूंचे एकाच छताखाली विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे व विक्रीला अधिकाधिक प्रोत्साहित करणेकरीता विविध वस्तूंचा सामावेश असून या वस्तू वैशिष्टपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत. या प्रदर्शानात ग्रामीण भागातील कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. जिल्ह्यातून 11तालुक्यातील 75 स्टॉल विविध गटांच्या माध्यमातून अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची नागरिकाना संधी लल देण्यात आली आहे .
ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नाविण्यपूर्ण उपक्रम साजरे करून गरीबातील गरीब कुटुंबाचे जास्तीत जास्त विक्री च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होवून जीवनमान उंचावून उद्योजक विकासात महत्वाचे योगदान मिळवून देणे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकुटुंब व सहपरिवारासह भेट देवून स्वयं सहाय्यता गटातील महिलांनी तयार केलेले वस्तूंची खरेदी करून प्रत्याहित करून मोठ्या संखेने सहभाग नोंदवून प्रदर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
महिलांनी आत्मनिर्भय बनण्यासाठी मनोधैर्य वाढविले पाहिजे, असे सांगून बीड जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील जातीय तणाव कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पोलीस हे सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. काही अडचणी किंवा मदत हवी असल्यास पोलीस ठाणे आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी, शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी म्हटले.