अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी चाकू हल्ला झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराने सैफवर हल्ला केला. रात्रीच्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने सैफवर चाकू हल्ला केला. सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
वांद्रे येथील राहत्या घरात काल मध्यरात्री सैफवर चाकू हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या व्यक्तीने दोन ते तीन वेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे.