संतोष देशमुख हत्या प्रकरण: आजच्या प्रमुख घडामोडी आणि न्यायालयीन प्रक्रिया

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते

9 डिसेंबर रोजी केज तालुक्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. 3 ते 3.15 वाजण्याच्या दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्याच दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाले, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला दिली.

अनिल गुजर यांनी असेही सांगितले की संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ जुळते. एसआयटीने वाल्मिक कराड याला 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. न्यायालय या मागणीवर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एसआयटीकडून वाल्मिक कराड याच्यावरील गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाने सादर केली. अन्य आरोपींविरुद्धही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली.

MCOCA कसा लागू करण्यात आला याचा संदर्भ एसआयटीने दिला. 9 ते 10 ग्राउंड्स वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी मांडले गेले. दरम्यान, कोर्टातील युक्तिवाद ऑन कॅमेरा सुरु आहे आणि दोन्ही पक्षाचे वकील, आरोपी, आणि तपास अधिकारी उपस्थित आहेत.

error: Content is protected !!