वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सकाळपासून वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नीनेही आंदोलनात सहभाग घेतला आहे.
वाल्मिक कराड यांच्या पत्नीने म्हटले की, या प्रकरणात निव्वळ जातीयवाद होत आहे आणि कोणतेही पुरावे नसताना दबावातून कारवाई केली जात आहे. त्यांनी वाल्मिक यांचा खंडणी आणि खून प्रकरणात कोणताही सहभाग नाही असे सांगितले आहे.
कराड यांच्या समर्थकांनीही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.