बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. आरोपींवर मोक्का कायदा लागू करण्यात आला आहे, तर वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. परंतु, त्याच्यावर 302 कलमांतर्गत कारवाई करण्याचा आग्रह आहे. विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन सुरू केले आहे, ज्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेही सहभागी आहेत. आंदोलन तीव्र होऊ शकते म्हणून बीड जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र येण्यास मनाई आहे. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश जारी केले आहेत.