पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली -पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या विभागाच्या बैठक संभाजीनगर इथे घेतीली त्यावेळी माध्यमशी बोलताना  बोलल्या की मी माझा  खात्याला बळकट करण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना उगीच झापले नाही, तर समजून घेतले आहे. प्रदूषण हा विषय राज्यापुरता नाही, तर जागतिक आहे. देश-विदेशातून मार्गदर्शन घेतले जात आहे. प्रदूषणाबाबत आढावा घेतला जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, मग ती महापालिका असो वा इतर कुणी. नदी पुनर्जीवन हे आमचे मुख्य काम असेल.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्या यावर कॉऊंटर करणार नाहीत. त्यांनी एसआयटीची मागणी केली होती आणि त्यांच्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे बोलत आहेत ते पूर्वी का बोलले नाहीत. मागील दोन वर्षांत का बोलले नाहीत. त्यांच्या मुळे बीड बदनाम झाले आहे. राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रितीने समजून घेतला असता तर बीड बदनाम झाले नसते. आमच्या जिल्ह्यातील लोक स्वाभिमानी आहेत. मी महिला राजकारणी म्हणून तिथे काम करते आणि सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो, नाहीतर दरोडे करायला गेलो असतो. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआय मधून माझ्याकडे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे. नागपूरची घटना काय, पुण्याची काय, असे सगळीकडे घडत आहे. मी पर्यावरण मंत्री आहे, यावर काय बोलू, मुख्यमंत्री भूमिका मांडत आहेत.

error: Content is protected !!